मी कोरले काही क्षण...!

मी कोरले काही क्षण....

थोडे तुझे, थोडे माझे
थोडे उत्कट, थोडे विकल
काही बावरे, काही विफल
काही आतुर, काही अव्यक्त
काही वेडे, काही विरक्त


मी कोरले काही क्षण
आठवणींच्या पाषाणावर...

12 Comments:

Maithili said...

'Me korale kahi kshan, aathavaninchya paashanawar' Sahiye......

Unknown said...

I really liked this. Short, simple and yet unveiling many emotions…..

Anuja Khaire said...

धन्यवाद!!
Maithili !!

Anuja Khaire said...

धन्यवाद!!
Deepali!!

अमोल said...

Sundar!!!

Akhil said...

मी कोरले काही क्षण आठवणींच्या पाषाणावर.
अश्रू शोधात आले पापणीला काठावर..

तेच पाहुनी.. थरथरली ती..
पापणी झाली ओलीसर..
थेंब थेंब साठुनी जाहले...
समुद्रतळे लोचन भर..
http://akhiljoshi.wordpress.com

Anuja Khaire said...

@Akhil

कसे हे अनाहुत

अव्यक्त भाव नयनी आले दाटून

पुन्हा त्याच आतूरतेची चाहुल होउन

तीच हुरहूर पुन्हा या क्षितिजावर
अश्रू शोधात आले पापणीला काठावर..

मी कोरले काही क्षण आठवणींच्या पाषाणावर

BinaryBandya™ said...

तीच हुरहूर पुन्हा या क्षितिजावर
अश्रू शोधात आले पापणीला काठावर..

मी कोरले काही क्षण आठवणींच्या पाषाणावर


faarach chhaan

Akhil said...

नयनी आल्या भावनांना
ओसरू देणार नाही मी..
डोळे भरतील तुझे अन..
काही घेणार नाही मी..

हात धरुनी हातात
मला स्तब्ध करशील तू..
हृदयी वसून माझ्या अंतरी..
माझे प्रारब्ध होशील तू..

असे क्षणही घेवून येतील. अश्रू पापणीच्या काठावर..
तेव्हा हे हि कोरून ठेव क्षण आठवणींच्या पाषाणावर..

Anuja Khaire said...

@Binary Bandya
धन्यवाद!!

Anuja Khaire said...

@अमोल
धन्यवाद!!

Anuja Khaire said...

@Akhil
तुझ्या ब्लॉगवरही वाचली ही कविता!
खूप सुंदर !!

Reference:
http://akhiljoshi.wordpress.com/2010/02/11/

Post a Comment

कागदाचं एक पान