खुप ठरवलं

खुप ठरवलं   
स्वत:च्या वाटा  तयार करायचं
प्रवाहा विरुद्ध पोहायच
आणि क्षितीजापलीकडे पाहायचं...

आडवणाऱ्या भिंतींना तोडायचं 
खाचा खळग्यान्ना  फुलं  मानायचं 
उदात्त  धेय्यांना कवटाळlयच
आणि जगणं  सोहळl  करायचं 

जस जसं आयुष्य सुरु झालं,   
एक एक स्वप्न तुटू लागल
वास्तव समोर येऊ लागल
आणखीनच हतबल करु लागलं

पुढयात  येणारी फुलंही काटे होती
यशाला मिंधेपण होतं
आणि समृद्धिला काळी किनार होती

खुप ठरवल...
स्वप्न पुन्हा शोधायचं
पुन्हा नव्याने  जगायच
प्रवाहा विरुद्ध पोहायचं
आणि क्षितीजा पलीकडे पाहायचं

पुन्हा त्याच वाटा
तेच काटेरी यश आणि तोच हतबलपणा...

पण पुन्हा ठरवलं
खुप ठरवायचं
स्वप्न पाहात  राहायचं
सत्य चितारायचं....

9 Comments:

HAREKRISHNAJI said...

सुरेख

Unknown said...

I just really can’t say, what drove you to write this….but really you have expressed the emotions of everyone who honestly tries to achieve something significant in life, but faces harsh reality.

रोहन... said...

मी सुद्धा 'खुप ठरवलंय' ... बघुया काय होतय!!! मस्त लिहितेस तू.

Anuja Khaire said...

Thanks Deepali. I really appreciate your interpretation.

One way to look at it is: Yes it is expressing the emotions of every human being who strives to achieve something great in life, but do not succeed.

Still he is optimistic towards his life that one day he could achieve his desired goal overcoming each obstruction, constraints, harsh realities and conventions to which he is tied to.

धन्यवाद!!
HAREKRISHNAJI!

धन्यवाद!!
रोहन!
खूप ठरवल आहे ना, ते ठरवणचं महत्वाचं आहे.

What matters most is our optimistic view. Gradually we go closer to our goal and one fine day find ourselves at the peak where we always desired to be at.

Akhil said...

अतिशय सुंदर ब्लोग आहे तुझा..
कदाचित तेवढाच माझाही असता तर?
http://akhiljoshi.wordpress.com

Anuja Khaire said...

धन्यवाद!!
Akhil !!

I must tell you, your blog is also beautiful. I read the poems.

'नव-स्पंदनासहित…' आणि 'गोंधळ' खूप आवडल्या.

Really liked the way you have put across the emotions.

स्पंदन चारोळी संग्रहाच्या लेखकाकडुन अशी प्रतिक्रिया मला मिळण .....खूप छान वाटत आहे. आशय व्यक्त करण्या बाबत मंगेश तेंडूलकरांनी त्यांच्या व्यंगचित्रंशी तुझ्या कवितांची तुलना केली आहे ग्रेट!!

BinaryBandya™ said...

अतिशय सुंदर

Anuja Khaire said...

@Binary Bandya
धन्यवाद!!

तुझी कविता 'बाकी थोडेसे' वाचली. खुप छान आहे!!

Really liked it!

Reference:
http://binarybandya.blogspot.com/2010/01/blog-post.html

© Ashwini Deshpande said...

hey dear ...kiti surekh ahe kavita...

Post a Comment

कागदाचं एक पान