पुन्हा त्याच शाश्वत जगात जगण्यासाठी ...

"देवाचा दूत ना तू?" मी त्याला रागानेच विचारले
त्याच्या डोळ्यातून होकार कळताच
आणखी रागे भरले
"तुला दिसत नाहीत ही दु: खं?
या व्यथा, वेदना,
का जगाला चिरडून  टाकतोयस ?
सांग ना सुख कुठे लपवलयस ते ....
दे इकडे ती तुझी जादुची कुपी
तुझ्यात हिंम्मत नसेल तर
मी शिंपडेन त्यातला जादुचा थेंब
जो करेल सार्यांची  व्यथा दूर
करेल सारं निर्मल, निरलस ...
नाही रे पहावत या जगाकडे
कसलं हे  तर्कशास्त्र तुझं ,
जगाला चालू  ठेवण्याचं?"
त्याच्या डोळ्यात मला विलक्षण विरक्ति दिसली.
तो म्हणाला "जाणून घ्यायचयं?"
मी अधीरतेने म्हणाले "हो"
आणि पुढच्याच क्षणी ...
माझे डोळे उघडले ...
पुन्हा त्याच अस्वस्थतेत, अधीरतेत आणि क्रूर कुतुहलात जगण्यासाठी....
पुन्हा त्याच शाश्वत जगात जगण्यासाठी...

0 Comments:

Post a Comment

कागदाचं एक पान