कोवळ्या किरणा पल्याड

मोठे शब्द, पल्लेदार वाक्यं
भावनांना आलेला ऊत
प्रत्येकाचे तेच दु : ख आणि तीच रडारड
तीच धडपड, तीच पळापळ आणि तीच आगपाखड
कोणी मला ती कोवळी  किरणे जी उगीचचं नवी स्वप्ने, आशा,
आणि  जीवन घेऊन येतायेत त्यांच्या देशात घेऊन जाईल का?
बघुया तरी काय जादू घडते तिथे ......
ओघळणारे अश्रू,
निसटणारी धेय्यं,
आणि निष्फळ प्रयत्नांच्या पल्याडचे जग
असते तरी कसे?
नक्कीच हवे-हवेसे, ताजे आणि चिरतरुण असेल ...
मला जायचयं  तिकडे, एकटच नाही राहायचयं तिथे
अगदी तसचं जग निर्माण करायचयं  ईथे ...
 कदाचित माझ्यासारखं  कुणी
शोधत येईल मग
कोवळ्या किरणा-पल्याडचे जग पाहायला ईथे  ...
मग मी देईन माझ्याकडची  अनमोल
शिदोरी ज्यात असतील उदात्त स्वप्ने, सफल आशा आणि देवदुतासारखी
भासणारी मनुष्य मात्रे  ...

1 Comments:

BinaryBandya™ said...

कोवळ्या किरणा-पल्याडचे जग ---faarach chhhan kalpana

Post a Comment

कागदाचं एक पान