असंख्य विचारांनी डोक्यात नुसते थैमान घातले होते, मग वाटल, आता लिहिलेच पाहिजे आणि ही कविता लिहिली.
स्वप्न फुलांच्या समिधा
आयुष्याच्या वाटेवर निरंतर चालताना
दिसतात फक्त खाच-खळगे
स्वप्नाफुलांच्या वाटेवर स्वच्छन्दपणे
बागड़णारे बिचारे मनभुंगे
विनातक्रार आयुष्य रेटणारे सोबती
पाहिले की
वाटते स्वत: चेच आश्चर्य
दिसतात स्वत: च्या बंडखोरीच्या
अस्पष्ट पाऊलखुणा
अस्तित्व शोधण्याचा केलेला असफल प्रयत्न
आणि प्रत्येक प्रयत्नान्ति मिळणारा निर्घ्रुण भ्रमनिरास
शांतिच्या आशेने भटकणारे मन
आणि सूदूर धेय्याला
गाठण्यास आसुसलेले खोल डोळे ............
याच डोळ्यात कधी अंगार फुलतात
कधी फुले उमलतात कधी निष्पाप बाळासारखे
हट्ट उमटतात
भकास जगातली सततची घुसमट
टाळा यला आतूर होउन पाणावतात.........
आशावादीच रहायचे हा अट्टहास
करून पावले निघतात पुन्हा त्याच आयुष्याच्या वाटेवर
निरंतर .......... चा ल ण्या स ........
- अनुजा
3 Comments:
अनुजा... कविता छान आहे... मला स्वतःला तंतोतंत फिट बसते म्हणुन विशेष आवडली...
रोज काहीतरी नवीन वाचावे या हेतूने नवीन-नवीन ब्लॉग शोधत असतो. कुठलाही ब्लॉग नवीनच वाचायला घेतला की त्या ब्लॉगच्या पाहिल्या पोष्टवर जाउन प्रतिक्रिया द्यायची ही आपली स्टाइल... :D
तेंव्हा अगदी पहील्यावहिल्या पोष्टवर प्रतिक्रिया आल्याचे पाहून दचकू नका.. आता संपूर्ण वाचायचा आहे तुमचा ब्लॉग... !!!
I am really more than happy that you visited, commented and on top of that liked my poems. It is really overwhelming getting appreciation from one of the well-known blogger, like you.
I would like you to read: http://vidnyaya-anuja.blogspot.com/2009/09/blog-post_25.html
आपण माझा ब्लॉग वाचलात ही माझ्यासाठी फारच मोठी गोष्ट आहे. मनापासुन धन्यवाद !!
well-known blogger - एकदम दडपण आले हो. हेहे.. असे काही नाही आहे खरे तर.. :)
Post a Comment