हे नीलकंठा
त्रिनेत्री ज्वाळा रुद्राक्ष गळा
हे नीलकंठा, उमावेल्हाळा
करी प्राशन हे दु: ख हलाहल
अर्पण तुला बेल, सफेद ते फूल
मी कलाकर य: किंचित
हे नटराजा ठेव तुझा वरदहस्त
या मनीची अथांग गुंतागुंत
तूच एक करी मुक्त
नमन तुज विनयेन
भक्त तुझा मी शोभेन
हे नीलकंठा,
आणि काय मागू आता
भोळ्या भक्ताचा तूच दाता, त्राता!
विठ्ठल विठ्ठल आळवी
विठ्ठल माझ्या ध्यानी मनी
सावळे रूप मनोहारी
किती गुण गायले तरी
देवा वीट नाही चित्ती
सुखे दु:खे नाम मुखी
विठ्ठल विठ्ठल आळवी
तुझ्याच पायी स्थैर्य संसारी
कोण मागणे आणखी नाही
बा विठ्ठला अशीच कृपा ठेवी
मी भाबडा जीव तुझे गुण गाई !
भाव डोळ्यात रिते झाले
भाव डोळ्यात रिते झाले
नि अश्रु ओसंडून आले
का, केव्हा, कसे
मो शोधत राहिले
कवितेचे पान पुन्हा गहिवरले
सुन्न मनाला आळवू लागले
त्या दिशांचे तराणे
क्षितिजावरच विरले
शब्दांना खूप वळविले
पण गीत खरे पापणीतून निखळले
शब्द तिथेच थिजले, लाजले
कारण भाव डोळ्यात रिते झाले
नि अश्रु ओसंडून आले
जुन्या अगम्य वाटा
आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा
भावनांच्या पानावर
निशब्द कविता
हळव्या मायभूमीवर
आशांचा कोसळता मनोरा
अथांग सागरावर
भयाण लाटा
का दिसतात आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा?
मंगल दिनी या शिवप्रभुंचे स्मरण
अश्विन सरताना पावन भूमीवर उजळतो दिप
तेजोमय दश-दिशा अन् प्रफुल्लित मनं
मंगल दिनी या शिवप्रभुंचे स्मरण
प्रदिप्त समशेर अन् विक्राळ दैत्यांचे खंडण
अश्वमेध तो स्वराज्याचा अजिंक्य
इतिहासाचे सोनेरी पान वीररसाने तप्त
अंगणी सजतो लघु दुर्ग तो मनमोहक
तट, बुरुज स्मरतो प्रौढ प्रताप पुरंदर
कृपाच अशी आमुच्या दिव्य राजाची अपार
आनंदाचे हे अथांग ऋण वदतो आम्ही पामर
अभिमानी आम्ही या थोर राज्याचे बालक
त्या तेजोदिप्त निष्णात तलवारीचे ऋणी अन् शिवबाचे साधक
तेजोमय दश-दिशा अन् प्रफुल्लित मनं
मंगल दिनी या शिवप्रभुंचे स्मरण
प्रदिप्त समशेर अन् विक्राळ दैत्यांचे खंडण
अश्वमेध तो स्वराज्याचा अजिंक्य
इतिहासाचे सोनेरी पान वीररसाने तप्त
अंगणी सजतो लघु दुर्ग तो मनमोहक
तट, बुरुज स्मरतो प्रौढ प्रताप पुरंदर
कृपाच अशी आमुच्या दिव्य राजाची अपार
आनंदाचे हे अथांग ऋण वदतो आम्ही पामर
अभिमानी आम्ही या थोर राज्याचे बालक
त्या तेजोदिप्त निष्णात तलवारीचे ऋणी अन् शिवबाचे साधक
Subscribe to:
Posts (Atom)






