मंगल दिनी या शिवप्रभुंचे स्मरण

अश्विन सरताना पावन भूमीवर उजळतो दिप 
तेजोमय दश-दिशा अन् प्रफुल्लित  मनं

मंगल दिनी या शिवप्रभुंचे स्मरण
प्रदिप्त समशेर अन् विक्राळ दैत्यांचे खंडण

अश्वमेध तो स्वराज्याचा अजिंक्य
इतिहासाचे सोनेरी पान वीररसाने तप्त

अंगणी सजतो लघु दुर्ग तो मनमोहक
तट, बुरुज स्मरतो प्रौढ प्रताप पुरंदर

कृपाच अशी आमुच्या दिव्य राजाची अपार
आनंदाचे हे अथांग ऋण वदतो आम्ही पामर

अभिमानी आम्ही या  थोर राज्याचे बालक
त्या तेजोदिप्त निष्णात  तलवारीचे ऋणी अन् शिवबाचे साधक



7 Comments:

Unknown said...

Great poem!Great words! I am speechless......

Unknown said...

Great poem!Great words! I am speechless.......

रोहन... said...

अनूजा... आज तुझी ही कविता वाचून माझी दिवाळी खरया अर्थाने साजरी झाली. :)

प्रदिप्त समशेर अन् विक्राळ दैत्यांचे खंडण.>>>

४ दिवसांनी म्हणजे १० तारखेला राजांनी एका विक्राळ दैत्यांचे खंडण केल्याला ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत. :)

होय अफझलखान वाढ... शिवप्रताप दिवस.

माझी पोस्ट आवर्जून वाच.. :)
http://marathahistorycalender.blogspot.com/2010/11/blog-post.html

Amol S. said...

Really nice poem with great words. Waiting for another release.

Yogesh said...

>>आज तुझी ही कविता वाचून माझी दिवाळी खरया अर्थाने साजरी झाली.+1


तुम्हाला व तुमच्या परीवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

CheSa said...

Extra-ordinary! Keep up the good penning! :)

BinaryBandya™ said...

अप्रतिम कविता ...

Post a Comment

कागदाचं एक पान