शब्द तेव्हा धावत येतात

मावळतीच्या गडद छटा
जेव्हा उदास वाटतात
पानांची सळसळ
संथ तराणे होते
क्षितिजावरच्या रेषा
जेव्हा धुसर होतात
शब्द तेव्हा धावत येतात...
आणि अनोखे भाव उलडगतात

8 Comments:

रोहन... said...

अनुजा... आज दिवस खूपच कंटाळवाणा गेला. उदास होते सर्वकाही. झोपायला जाण्याआधी मात्र नेमके तुझे शब्द वाचले. छान वाटले... :)

Anuja Khaire said...

@रोहन चौधरी,
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!!

Yogesh said...

अनुजा ताइ...खुप छान लिहलय...खुप मस्त वाटल वाचुन.

Anuja Khaire said...

@मनमौजी,
धन्यवाद!!

vaibhav_sadakal said...

खूप वेळा दु:ख असेल तेव्हा शब्द मदतीला येतात आणि आनंद व्यक्त करायला शब्दच मिळत नाहीत नाही का?
छान लिहीलंय...

रोहन... said...

काय.. आहात कुठे?? बरेच दिवस लिखाण नाही...

माझ्या इंग्रजी ब्लोगवर कमेंटमध्ये आपण राजांविषयी लिहिलेली कविता मस्तच आहे... ती कविता माझ्या एखाद्या मराठी पोस्ट मध्ये समाविष करावी असा मानस आहे. अर्थात आपली परवानगी असेल तर..

Anuja Khaire said...

धन्यवाद रोहन !! हो अवश्य! मला आवडेल ती कविता आपण आपल्या मराठी पोस्ट मध्ये समाविष्ट केली तर!

Anuja Khaire said...

@vaibhav,
हो सुख-दु:खाच्या वेळी शब्दच सोबतीला असतात. या कवितेवर आपले विचार व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद!!

Post a Comment

कागदाचं एक पान