पुन्हा तारे तुटताना
मी बालिशपणे खुप काही मागितले
काही स्वप्नं आणि खरे खुरे यत्न...
सारे डोळ्यांसमोर तरळले
तो ताराही तसाच क्रूर निघाला तर .....?
भाबडे मन ससा झाले
कावरु बावरु पिसे झाले
पुन्हा तारे तुटताना
नको तो बालिशपणा
पुन्हा तेच मागणे
तिच निराशा
आणि पुन्हा तोच प्रश्न
तो ताराही तसाच क्रूर निघाला तर ....?
5 Comments:
मन झालेय सशासारखे..
कावरे बावरे होणारे..
भावना मनी दडवूनी...
थरथर थरथर कापणारे..
कोण न समजे.. जाणिजे,
यातना लोचने पाही.. जे..
संगती थरथरणारी अधरे..
येवून मजला सावर रे..
आकाशात लुकलुकणारा तारा...
तुझ्याच तर डोळ्यात पाहायचाय मला..
काळजाचा वेध घेणारा शब्द
कवितेत अजून सापडायचं मला..
@Akhil
सुरेख!!
तुझ्या ब्लॉगवरही वाचली ही कविता!
Reference:
http://akhiljoshi.wordpress.com
Apratim!!
तो ताराही "तसाच" क्रूर निघाला तर ????
faarach chhan
गेल्या आठवडयामध्ये चक्क २ वेळा तारा तूटताना पहिला.. :)
Post a Comment