दडपून टाकलेले काही आवाज

दडपून टाकलेले काही आवाज
आज  मनात आवाज उठवत होते

आत काहीतरी तुटत होतं 
साद घालून थकत होतं ...

इतके दिवस दाबून ठेवलेल्या वेदना
भटकं मन विसकटत होतं ...

एरवी ओरड़त राहणारं  मन
आज मौनाची भाषा  करत होतं

आठवणींचे   धागे-दोरे जमवून
मखमली  स्वप्नांच्या  शाली विणत होतं

तुटलेल्या धाग्यान्ना  कवटाळत होतं
आणखीनच कातर होत होतं   

मी त्याला  उगी उगी केलं
पण आज सगळचं  न्यारं  होतं .....

कारण,

दडपून टाकलेले काही आवाज.......
आज  मनात आवाज उठवत होते...........

7 Comments:

Ajay Sonawane said...

कविता मनापासुन आवडली, बाकीच्या ही सारया कविता वाचल्या. एकंदर लिहिण्याची शैली मस्त आहे.

तुटलेल्या धाग्यान्ना कवटाळत होतं
आणखीनच कातर होत होतं

ही कल्पना फार आवडली.

-अजय

विक्रम एक शांत वादळ said...

दडपून टाकलेले काही आवाज.......
आज मनात आवाज उठवत होते...........

chanch

रविंद्र "रवी" said...

अप्रतिम काव्य !
"आठवणींचे धागे-दोरे जमवून
मखमली स्वप्नांच्या शाली विणत होतं"
मी आताच एक कविता पोस्टवर टाकली आहे. भविष्यातील आठवणींबद्दल, वाचून पहावी जमल तर.

Anuja Khaire said...

Thanks Ajay!
Thanks Vikram!
Thanks Ravindra!

Amol S. said...

Wow...Thats great Poems I have read ever. I am expecting for more.

BinaryBandya™ said...

दडपून टाकलेले काही आवाज.......
आज मनात आवाज उठवत होते...........

faar chaan...

Anuja Khaire said...

धन्यवाद!!
Amol!
Binary Bandya!

Post a Comment

कागदाचं एक पान