पुन्हा तारे तुटताना
मी बालिशपणे खुप काही मागितले
काही स्वप्नं आणि खरे खुरे यत्न...
सारे डोळ्यांसमोर तरळले
तो ताराही तसाच क्रूर निघाला तर .....?
भाबडे मन ससा झाले
कावरु बावरु पिसे झाले
पुन्हा तारे तुटताना
नको तो बालिशपणा
पुन्हा तेच मागणे
तिच निराशा
आणि पुन्हा तोच प्रश्न
तो ताराही तसाच क्रूर निघाला तर ....?
मी कोरले काही क्षण...!
मी कोरले काही क्षण....
थोडे तुझे, थोडे माझे
थोडे उत्कट, थोडे विकल
काही बावरे, काही विफल
काही आतुर, काही अव्यक्त
काही वेडे, काही विरक्त
मी कोरले काही क्षण
आठवणींच्या पाषाणावर...
थोडे तुझे, थोडे माझे
थोडे उत्कट, थोडे विकल
काही बावरे, काही विफल
काही आतुर, काही अव्यक्त
काही वेडे, काही विरक्त
मी कोरले काही क्षण
आठवणींच्या पाषाणावर...
खुप ठरवलं
खुप ठरवलं
स्वत:च्या वाटा तयार करायचं
प्रवाहा विरुद्ध पोहायच
आणि क्षितीजापलीकडे पाहायचं...
आडवणाऱ्या भिंतींना तोडायचं
खाचा खळग्यान्ना फुलं मानायचं
उदात्त धेय्यांना कवटाळlयच
आणि जगणं सोहळl करायचं
जस जसं आयुष्य सुरु झालं,
एक एक स्वप्न तुटू लागल
वास्तव समोर येऊ लागल
आणखीनच हतबल करु लागलं
पुढयात येणारी फुलंही काटे होती
यशाला मिंधेपण होतं
आणि समृद्धिला काळी किनार होती
खुप ठरवल...
स्वप्न पुन्हा शोधायचं
पुन्हा नव्याने जगायच
प्रवाहा विरुद्ध पोहायचं
आणि क्षितीजा पलीकडे पाहायचं
पुन्हा त्याच वाटा
तेच काटेरी यश आणि तोच हतबलपणा...
पण पुन्हा ठरवलं
खुप ठरवायचं
स्वप्न पाहात राहायचं
सत्य चितारायचं....
स्वत:च्या वाटा तयार करायचं
प्रवाहा विरुद्ध पोहायच
आणि क्षितीजापलीकडे पाहायचं...
आडवणाऱ्या भिंतींना तोडायचं
खाचा खळग्यान्ना फुलं मानायचं
उदात्त धेय्यांना कवटाळlयच
आणि जगणं सोहळl करायचं
जस जसं आयुष्य सुरु झालं,
एक एक स्वप्न तुटू लागल
वास्तव समोर येऊ लागल
आणखीनच हतबल करु लागलं
पुढयात येणारी फुलंही काटे होती
यशाला मिंधेपण होतं
आणि समृद्धिला काळी किनार होती
खुप ठरवल...
स्वप्न पुन्हा शोधायचं
पुन्हा नव्याने जगायच
प्रवाहा विरुद्ध पोहायचं
आणि क्षितीजा पलीकडे पाहायचं
पुन्हा त्याच वाटा
तेच काटेरी यश आणि तोच हतबलपणा...
पण पुन्हा ठरवलं
खुप ठरवायचं
स्वप्न पाहात राहायचं
सत्य चितारायचं....
अश्रुंचीही एक भाषा असते
गोठलेले अश्रु आज वितळले
सुन्न किनारी फिरताना मला बिलगले
खूप काही सांगू लागले,
म्हणाले,
अश्रुंचीही एक भाषा असते
त्या पैलतीरी जाताना ती ऐकू येते
असे किनारे ओलांडताना .....
नवी क्षितिजे पाहताना ...
झुरताना...
कष्टताना....
सुदूर धेय्याची स्वप्ने पाहताना ....
ती खूप काही शिकवून जाते
अश्रुंचीही एक भाषा असते....
सुन्न किनारी फिरताना मला बिलगले
खूप काही सांगू लागले,
म्हणाले,
अश्रुंचीही एक भाषा असते
त्या पैलतीरी जाताना ती ऐकू येते
असे किनारे ओलांडताना .....
नवी क्षितिजे पाहताना ...
झुरताना...
कष्टताना....
सुदूर धेय्याची स्वप्ने पाहताना ....
ती खूप काही शिकवून जाते
अश्रुंचीही एक भाषा असते....
चार क्षण ऊन
चार क्षण पाऊस
चार क्षण ऊन
भरजरी शालीचे
सोनेरी धागे उसवून
मी विणले हे सक्त धागे कसे कोणास ठाऊक
थंडगार वाऱ्याची झुळ्ळूक आली
पावसाचा शिडकावा घेऊन
मी मात्र पाहीला
घोंघावणारा वारा आणि लख्खं ऊन
पाखरांची साद आली
मंजूळ क्षणी गात
मी मात्र ऐकले शांत तटस्थ आगाज...
अशाही रुक्ष वनात तू शोधलेस
दवबिंदू नवलाइचे
तुझ्या पोरकट स्वप्नाने केले
सारे सोहळ्याचे....
चार क्षण पाऊस
चार क्षण ऊन
दे ना तुझे स्वप्न
देईन माझ्या उशाशी ठेवून...
चार क्षण ऊन
भरजरी शालीचे
सोनेरी धागे उसवून
मी विणले हे सक्त धागे कसे कोणास ठाऊक
थंडगार वाऱ्याची झुळ्ळूक आली
पावसाचा शिडकावा घेऊन
मी मात्र पाहीला
घोंघावणारा वारा आणि लख्खं ऊन
पाखरांची साद आली
मंजूळ क्षणी गात
मी मात्र ऐकले शांत तटस्थ आगाज...
अशाही रुक्ष वनात तू शोधलेस
दवबिंदू नवलाइचे
तुझ्या पोरकट स्वप्नाने केले
सारे सोहळ्याचे....
चार क्षण पाऊस
चार क्षण ऊन
दे ना तुझे स्वप्न
देईन माझ्या उशाशी ठेवून...
विरह
धूसर होणाऱ्या पायवाटा
आणि घननीळ समुद्राचा आगाज
त्या नीरव शांततेत
तुझ्या आठवाने कंपित होणारे हृदय.....
त्या घननादाच्या दिशेने माझे अकल्पित जाणे
तुझ्या-मुळच विदीर्ण झालेल्या मनाचे
पुन्हा तुझ्याच ओढीने
अधीर होणे ....
हे मात्रुभूमी,
तुझा जिव्हारी लागत जाणारा
विरह सहन होत नाही....
आणि घननीळ समुद्राचा आगाज
त्या नीरव शांततेत
तुझ्या आठवाने कंपित होणारे हृदय.....
त्या घननादाच्या दिशेने माझे अकल्पित जाणे
तुझ्या-मुळच विदीर्ण झालेल्या मनाचे
पुन्हा तुझ्याच ओढीने
अधीर होणे ....
हे मात्रुभूमी,
तुझा जिव्हारी लागत जाणारा
विरह सहन होत नाही....
दडपून टाकलेले काही आवाज
दडपून टाकलेले काही आवाज
आज मनात आवाज उठवत होते
आत काहीतरी तुटत होतं
साद घालून थकत होतं ...
इतके दिवस दाबून ठेवलेल्या वेदना
भटकं मन विसकटत होतं ...
एरवी ओरड़त राहणारं मन
आज मौनाची भाषा करत होतं
आठवणींचे धागे-दोरे जमवून
मखमली स्वप्नांच्या शाली विणत होतं
तुटलेल्या धाग्यान्ना कवटाळत होतं
आणखीनच कातर होत होतं
मी त्याला उगी उगी केलं
पण आज सगळचं न्यारं होतं .....
कारण,
दडपून टाकलेले काही आवाज.......
आज मनात आवाज उठवत होते...........
आज मनात आवाज उठवत होते
आत काहीतरी तुटत होतं
साद घालून थकत होतं ...
इतके दिवस दाबून ठेवलेल्या वेदना
भटकं मन विसकटत होतं ...
एरवी ओरड़त राहणारं मन
आज मौनाची भाषा करत होतं
आठवणींचे धागे-दोरे जमवून
मखमली स्वप्नांच्या शाली विणत होतं
तुटलेल्या धाग्यान्ना कवटाळत होतं
आणखीनच कातर होत होतं
मी त्याला उगी उगी केलं
पण आज सगळचं न्यारं होतं .....
कारण,
दडपून टाकलेले काही आवाज.......
आज मनात आवाज उठवत होते...........
Subscribe to:
Posts (Atom)