शिवतेज

शब्दातीत  युगपुरुष तू
शौर्य, सुमेधा अन् मांगल्याचा सूर्य
या पावन भूमीचा राजा की  आत्म्याचा ईश्वर

समरांगणी  पेटल्या सहस्त्र वीर तलवारी
हर एक सूर्यशक्तीसम तुझ्या प्रज्ञेने तेजाळलेली

वैराण भूमीवर अनमोल सृष्टी चे व्रत
अखिल जगी तुझे उदात्त राज्य
साक्ष आहे शुक्ल पक्षीचा चन्द्र

आजही गहीवरे प्रत्येक माता
कधी लाभेल  मुक्तीचे पुण्य 
अन् पुत्र तुजसम त्राता

निश्चल मृतप्राय आज पुन:श्च ही भूमी
अर्जुन रक्तास हवी तुझ्या प्रेरणेची नवसंजीवनी

- अनुजा खैरे

15 Comments:

Unknown said...

I am speechless. Incredible poem…..

विक्रम एक शांत वादळ said...

निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी...
यशवंत,कीर्तिवंत,
सामर्थ्यवंत,वरदवंत
पुण्यवंत,नीतिवंत
'जाणता राजा '
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८० व्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा !
कविता एकदम मस्त आवडली मला

Ajay Sonawane said...

Anuja,

khupch chan ahe, vachun agdi pratyek shabadaganik utsah salasalaa...

ya lines phar aavadalya....

निश्चल मृतप्राय आज पुन:श्च ही भूमी
अर्जुन रक्तास हवी तुझ्या प्रेरणेची नवसंजीवनी


Good work !

-Ajay

Anuja Khaire said...

@विक्रम
धन्यवाद!!
I also liked your inspiring post
सध्याचे तरुण शिवजयंतीनिम्मित्त महाराजांचा आदर्श घेतील का ?
Reference: http://jivanmulya.blogspot.com/

Anuja Khaire said...

@Ajay
धन्यवाद!!
Happy to hear from a popular blogger.

Anuja Khaire said...

@Deepali
Thanks!!

Shivaji Babar said...

खूप छान आहे. कविता आवडली मला.

Unknown said...

Extremely inspirational and don’t know…how to describe.
Khup awadli

Sushil said...

Authentic वीररस! छान आहे कविता!

रोहन... said...

अनुजा.. आपल्या कविता मनात स्फूर्ती निर्माण करितात.

आपण इतिहासावर अधिक वाचन करावे आणि अश्या कविता अधिक लिहाव्यात असे मनास वाटते आहे.

ह्या संदर्भात काहीही मदत हवी असल्यास कळवणे. धन्यवाद...

Anuja Khaire said...

@Shivaji Babar
vaishnavi
Sushil
मनापासुन धन्यवाद!!

Anuja Khaire said...

@रोहन चौधरी
धन्यवाद!!
या कल्पनेवर नक्की विचार करेन त्यासाठी इतिहासाचा सखोल अभ्यास करावा लागेल.
आपले इतिहासाच्या साक्षीने ... ! आणि Chatrapati Shivaji Maharaj ... ! हे अतिशय लोकप्रिय ब्लॉग्स खूपच अभ्यासपूर्ण असतात!
आपले मार्गदर्शन लागेलच. काही अडचण अथवा शंका असल्यास नक्कीच आपणास कळवेन!

पुन्हा एकदा धन्यवाद!!

Yogesh said...

"निश्चल मृतप्राय आज पुन:श्च ही भूमी
अर्जुन रक्तास हवी तुझ्या प्रेरणेची नवसंजीवनी". .. . अप्रतिम!!!खूप छान लिहाली आहे ही कविता!!!

Anuja Khaire said...

@मनमौजी
मनापासुन धन्यवाद!!

Akhil said...

वीर रसाला अजुनी माझा स्पर्श झाला नाही..
पण तू माझ्या नावाचा समावेश त्यात सहजतेने केलास..
शिवाजीचा वापर अनेक जणांनी केला, करत आहेत..
पण त्यांना खरा शिवाजी कळला नाही हा दैव दुर्विलास..!!

खूप शूर कविता आहे तुझी..

Post a Comment

कागदाचं एक पान