चार क्षण पाऊस
चार क्षण ऊन
भरजरी शालीचे
सोनेरी धागे उसवून
मी विणले हे सक्त धागे कसे कोणास ठाऊक
थंडगार वाऱ्याची झुळ्ळूक आली
पावसाचा शिडकावा घेऊन
मी मात्र पाहीला
घोंघावणारा वारा आणि लख्खं ऊन
पाखरांची साद आली
मंजूळ क्षणी गात
मी मात्र ऐकले शांत तटस्थ आगाज...
अशाही रुक्ष वनात तू शोधलेस
दवबिंदू नवलाइचे
तुझ्या पोरकट स्वप्नाने केले
सारे सोहळ्याचे....
चार क्षण पाऊस
चार क्षण ऊन
दे ना तुझे स्वप्न
देईन माझ्या उशाशी ठेवून...
विरह
धूसर होणाऱ्या पायवाटा
आणि घननीळ समुद्राचा आगाज
त्या नीरव शांततेत
तुझ्या आठवाने कंपित होणारे हृदय.....
त्या घननादाच्या दिशेने माझे अकल्पित जाणे
तुझ्या-मुळच विदीर्ण झालेल्या मनाचे
पुन्हा तुझ्याच ओढीने
अधीर होणे ....
हे मात्रुभूमी,
तुझा जिव्हारी लागत जाणारा
विरह सहन होत नाही....
आणि घननीळ समुद्राचा आगाज
त्या नीरव शांततेत
तुझ्या आठवाने कंपित होणारे हृदय.....
त्या घननादाच्या दिशेने माझे अकल्पित जाणे
तुझ्या-मुळच विदीर्ण झालेल्या मनाचे
पुन्हा तुझ्याच ओढीने
अधीर होणे ....
हे मात्रुभूमी,
तुझा जिव्हारी लागत जाणारा
विरह सहन होत नाही....
Subscribe to:
Posts (Atom)