मोरपंखी क्षितिजावर आज एक वेगळीच लाली
जुन्या आठवणींची त्यास अबोध खोली
मन भटका वाटसरू एखादा
उन्हात अवेळी फिरणारा
कविता त्याची अगोड शिदोरी निकडीची
पाखराचा तो जीवघेणा चित्कार
भेसूर कसा तो वाटेना
मनाचे नेहमीचेच हे असे रडे
जुन्या आठवणींची त्यास अबोध खोली
मन भटका वाटसरू एखादा
उन्हात अवेळी फिरणारा
कविता त्याची अगोड शिदोरी निकडीची
पाखराचा तो जीवघेणा चित्कार
भेसूर कसा तो वाटेना
मनाचे नेहमीचेच हे असे रडे
वेगळे काय त्यात?
बोच छळणारी कुठलीतरी
संपलेल्या वाटेवर आशेची कांडी पुन: पुन्हा फिरणारी
नभ असे नवीन का भासत नाहीत कधीच
कि मीच ते नाविन्य शोधू शकत नाही?
काय हे, पुन्हा आला तो
पाऊस नवी कहाणी घेऊन
तीच नवी आशा आणि नवी तराणी घेऊन
मन भटका वाटसरू गेला गोंधळून