अतिशय कमी शब्दांतून मार्मिक अर्थ व्यक्त करणारी चारोळी मला नेहमीच भुरळ घालत आली आहे...ती लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
१) माझ्या देशात लोक स्वप्नं जाळतात
त्यावर दु:खाची पोळी भाजतात
आणि पोट भरलं म्हणून
सुखाने झोपतात
२) अवती भवती हिरवळ
पानांची सुमधुर सळसळ
सूर्याचा पहिला किरण
हे स्वप्नच का केवळ ?
३) कित्येक स्वप्नांचा चुरा
इथे रोज होतो
तरीही नव्या आशांचा मनोरा
आम्ही रोज रचतो
४) चार चार ओळी लिहीताना
माझी झाली चारोळी
व्यक्त काही झाले की नाही
मी तोडली चाकोरी
6 Comments:
पहिलाच प्रयत्न का हा? वाटत नाही....खूप सुरेखपणे शब्दांत गुंफलं आहे!
वाह...सुंदर शब्दबद्ध केला आहे...मस्त..मस्त...
ह्या केवळ चार ओळी नाहीत,
त्या बरंच काही बोलतात;
मनोरथाचे अश्वच जणू ,
चौफेर, स्वच्छंद दौडतात.
@vaishnavi,
हो हा पहिलाच प्रयत्न प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!!
@मनमौजी,
प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद!!
@CheSa,
Liked this unique way of commenting!
या सुंदर चारोळीसाठी मनापासून धन्यवाद!!
Post a Comment