काळ्या ढगाची कृपा कधी होणार?
कोरडया डोळ्यातली आस
देवा तुला कधी कळणार?
पेटत्या निखाऱ्यावर चालणारी ती पावलं
रडवेली पोरं
अन् राब-राबून थकलेल्या हातांची वेदना
देवा तुला कधी कळणार?
भूमीपुत्राची ही दशा
धगधगत्या वास्तवात जळणारी त्याची आशा
या शेतात पालवी कधी फुटणार
रानात केलेलं रक्ताचं पाणी
देवा तुला कधी दिसणार?
भुकेचा वणवा तर अन्नदात्याच्याच पोटात
काय देवा तुझा न्याय काही जात्यात तर काही सुपात!